पाचोरा येथे मान्यवरांची उपस्थिती
पाचोरा (प्रतिनिधी):- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेद्वारे संचलित गो. से. हायस्कूल येथे फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम १० क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत व सत्कार समारंभ मंगळवार २७ मे रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे होते.
उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षक आर. बी. तडवी, ज्येष्ठ शिक्षक आर. बी. बांठीया, तांत्रिक विभागाचे प्रमुख एस. एन. पाटील, आकाश वाघ, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक, सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. आर. पाटील यांनी केले. तर आर. एन. सपकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.