पाचोऱ्यात कार्यकर्त्यांची बैठक
पाचोरा (प्रतिनिधी) : मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा येथे मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पत्रकार यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेबांच्या प्रतिमेचे पूजन राजू भोसले, दिपक पाटील व एन आर ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येऊन कार्यक्रम सुरू करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला ३४ वर्ष पूर्ण झाले. शिव सेवक राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले व जिजाऊ वंदना म्हणून मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या सर्व माजी पदाधिकारी यांचा मान सन्मान करून सत्कार करण्यात आला. तसेच सिंधूदुर्ग येथील महाराजांच्या पुतळ्याप्रकरणी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या पुढे सेवा संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा मानस सर्वांनी एकजुटीने करणार असल्याचे प्रतिपादन उपस्थितांनी केलें.
या प्रसंगी पूढील काळात करावयाची रणनिती देखिल ठरविण्यात आली. दर महिन्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक बोलावली जाईल असे आश्वासन ज्येष्ठ पदाधिकारी यांनी दिले. तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या कार्यकारिणीबाबत देखिल चर्चा करण्यात आली. बऱ्याच दिवसानंतर झालेल्या बैठकमुळे कार्यकर्त्यात आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुढील वाटचालीस संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विकास पाटील, राजेंद्र पाटील, एन आर ठाकरे, एस ए पाटील, सुधाकर पाटील, प्रा बी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
प्रसंगी सुनील पाटील, जिभाऊ पाटील, राजू भोसले, एन आर ठाकरे, विकास पाटील, दिपक पाटील, गणेश पाटिल, राजेंद्र पाटील, रवि पाटील , प्रा वाय. ओ पाटील, प्रा बी एन पाटील, मुजहिद खान, संजय पाटील, रोहिदास पाटील, अनिल मराठे, गजमल पाटील, प्रशांत पाटील, अनिल येवले, नंदकुमार शेलकर तसेच प्रमोद पाटील, निलेश मराठे, राकेश पाटील, दिपक मुळे, उमेश हटकर, शरद मोरे, किशोर पाटील, लीलाधर पाटील, भैय्या पाटील, सोपान पुंड, प्रकाश पाटील, सचिन पाटील, मुकेश तुपे, भाऊसाहेब बोरसे, वीरेंद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थीत होते.