पाचोरा बसस्थानकातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याची पोत चोरीस गेल्याची घटना दि. ३ ऑगस्ट शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाचोरा बसस्थानकावर घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिकूबाई परदेशी (वय ४५,रा. गाळण ता. पाचोरा) ही महिला शनिवारी दि. ३ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पाचोरा-गाळण बसमध्ये बसत होती. त्यावेळेला दरवाजातून चढत असताना अचानक महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याची पोत अज्ञात महिलेने लांबवली आहे. या महिलेने आरडाओरड केली असता पोत चोरून नेणारी महिला बेपत्ता झाली. याबाबत भिकूबाई परदेशी यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला दि. ३ ऑगस्ट रोजी दाखल केली आहे.