पाचोरा (प्रतिनिधी) : कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग (ए. टी. डी.) प्रथम वर्ष वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात पाचोरा येथील अनिल देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा १००% निकाल लागला असून महाविद्यालयाचे ४ विद्यार्थी डिस्टिंक्शन (जिल्हा स्तर) मध्ये उत्तीर्ण झाले.
महाविद्यालयातून प्रथम क्रमांक – जोशी तीर्थराज विवेक, द्वितीय क्रमांक – पाटील वैष्णवी किरण, तृतीय क्रमांक – पाटील सानिका शांताराम, चतुर्थ क्रमांक – पाटील वृषाली अरुण, पाचवा क्रमांक – कासार प्रिया कैलास हे विद्यार्थी विशेष गुणांनी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा कुसूम मित्रा यांनी विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप पाटील, प्रा. महेंद्र पाटील, प्रा. राहुल सोनवणे, संदीप परदेशी, शुभम पाटील, जि. प. प्राथ. शाळा चिंचपुरे येथील मुख्याध्यापक सुभाष देसले व पालकांनी अभिनंदन केले.