विविध विषयावर वकिलांसह शिक्षकांचे मार्गदर्शन
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गो.से.हायस्कूल येथे आज दि. २० जुलै रोजी तालुका विधी सेवा समिती पाचोरा, तालुका वकील संघ पाचोरा व गो.से. हायस्कूल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी.बी. औंधकर, न्यायमूर्ती एस.व्ही.निमसे, न्यायमूर्ती जी.बी.बोरा, पाचोरा तालुका वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एम.वाघ व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर शाळेतील उप शिक्षिका श्रद्धा पवार, ‘मुलांचे अधिकार’ या विषयावर ऍड. राहुल पाटील, ‘शिक्षणाचा अधिकार’या विषयावर ऍड.चंचल पाटील, ‘पोस्को कायदा’ या विषयावर ऍड. जी.डी. पाटील यांनी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून न्यायमूर्ती औंधकर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना स्री-पुरुष समानता, समाजतील आई-वडिलांचे व शिक्षकांचे स्थान, मुली व महिलांची सुरक्षा व त्यातील कायद्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर गो.से हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी एक छोटेसे पथनाट्य सादर केले. शाळेचे उपमुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, पर्यवेक्षक आर. एल.पाटील, ए.बी.अहिरे, पाचोरा वकील संघाचे पदाधिकारी सर्व सदस्य, शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. मंगेश गायकवाड तर आभार प्रदर्शन एम.टी.कौंडिण्य यांनी केले.