पाचोरा (प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से.हायस्कूल पाचोरा येथे दिनांक २ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, शिक्षणाधिकारी( माध्य)जि. प.जळगाव डॉ. नितीन बच्छाव,, संस्थेचे संचालक सतीश चौधरी, योगेश पाटील,मुख्याध्यापिका पी.एम. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तराचे वाटप करण्यात आले. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या ग्रंथालय व संगीत हॉलचे उद्घाटन करण्यात आले. वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.