पाचोरा (प्रतिनिधी ) ;- श्री.गो. से. हायस्कूल मध्ये आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील , भडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विश्वासराव साळुंखे उपमुख्याध्यापिका सौ. पी एम वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील , एन आर पाटील ए. बी. अहिरे तांत्रिक विभाग प्रमुख एस एन पाटील कार्यालय अधीक्षक अजय सिनकर, एम एन देसले व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.