पाचोरा;- शहरातील बाजारपेठ जामनेर रोड व भुयारी मार्ग जवळील हॉकर्सचे अतिक्रमण आज ४ जून रोजी सकाळी ६ वाजेपासून हटवण्यात आले आहे. पाचोरा नगरपालिका, व पाचोरा पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. तसेच ही कारवाई करण्याआधी सर्व हॉकर्सला एक दिवस आधी सूचना केल्या होत्या व त्यांनीही सहकार्य केले. पाचोरा नगर पालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले , कर अधिक्षक मराठे साहेब , व इतर कर्मचारी, पाचोरा पोलीस विभागातर्फे पोलीस अधिक्षक किसन नजन पाटील, ए.पी.आय मोरे, विकास पाटील, श्री. नरवले व श्री चौबे यांनी कारवाई केली.