पाचोरा:- येथील नगरपरिषदेतर्फे म.जिल्हाधिकारी सो. जळगांव यांनी दिलेल्या आदेशानूसार पाचोरा शहरात व्यवसाय करण्याकरीता दिलेल्या सकाळी 7 ते 11 या विहीत मुदतीनंतर देखील सुरु असलेल्या गंगा सुपर शॉपी यांना ५ हजार , हॉटेल गुरुकृपा ५ हजार ,शितल स्विटस ५ हजार आदी दुकानांवर धडक कारवाई करण्यात आली. त्याच प्रमाणे Non-Eccencial ज्यांना परवानगीच नाही उदा.कापड दुकान, चप्पल बुटाची दुकाने, केशकर्तनालये, रेडिमेड कापडाची दुकाने, नामे पायल /हितेश ड्रेसेस १० हजार , सिजर्स ॲड रेझर्स केशकर्तनालय ५ हजार इतक्या रकमेचा दंड करण्यात आला तसेच शहरात विनामास्क फिरत असलेल्या नागरीकांकडून व कोवीड 19 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणा-या नागरीक / दुकानदार यांचेकडून एकंदरीत रुपये ५६ हजार मात्र रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यांनी केली कारवाई
हि कारवाई मुख्यधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यांत प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निर्धारण अधिकारी साईदास जाधव, राजेंद्र शिंपी, विलास देवकर, प्रकाश गोसावी, फायरमन भागवत पाटील,विजेंद्र निकुंभ,पोलिस प्रशासनाकडून नंदकुमार जगताप, सुनील पाटील, बापु महाजन, प्रकाश पाटील व महिला होमगार्ड न.पा.तर्फे अनिल वाघ, प्रशांत कंडारे, भिकन गायकवाड, किशोर मराठे, संदीप जगताप, सुभाष बागुल, प्रकाश लहासे आदी अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.