धरणगाव (प्रतिनिधी ) – कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी हत्याकांडातील पाचही आरोपींना आज धरणगाव न्यायालयात हजर करण्यात आले पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली

जळगाव येथून १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिली. तपासावर परिणाम होऊ नये म्हणून आरोपींची नावे पोलीस अधीक्षकांनी गोपनीय ठेवली आहेत
आज धरणगाव न्यायालयात न्या. सावरकर यांच्यासमोर आरोपींना हजर करण्यात आले. पोलिसांनी पाच आरोपींसाठी न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार कोर्टाने १३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पाचही आरोपींची लागलीच जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली. या गुन्ह्यात आरोपींची संख्या सहा असून एक आरोपी मिळून आलेला नाही. पुरावा किंवा क्ल्यू नसताना पोलिसांनी आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी दाखवली.







