जळगाव ( प्रतिनिधी ) – घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील चार जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदेवनगर येथील मोहिनी बेंडाळे यांचा विवाह जळगाव तालुक्यातील खेडी येथील तुषार ज्ञानदेव बेंडाळे यांच्यासोबत झाला लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्यांकडून विवाहिता मोहिनीने तिच्या माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावे अशी मागणी करण्यात आली. यावरून तिला पतीने मारहाण केली सासरच्या मंडळींनी उलट सुलट बोलून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. मोहिनी बेंडाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती तुषार बेंडाळे , सासरे ज्ञानदेव बेंडाळे , नणंद कुमुदिनी कोल्हे ( सर्व रा. खेडी ता. जळगाव ) व दीर प्रवीण बेंडाळे ( रा. एमआयडीसी जळगाव) या चारजणांविरुध्द शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश युवराज पाटील हे करीत आहेत.