जळगाव (प्रतिनिधी) :- के. सी. ई च्या पी. जी.महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी जळगाव येथील जैन व्हॅली औद्योगिक समूहास भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत विभागातील प्रा. संदीप पाटील प्रा.दीक्षा सातपुते व गणेश माळी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना अद्यावत जैवतंत्रज्ञान प्रयोग शाळेतील विविध अन्न परीक्षण पद्धतींची व उपकरणांची माहिती देण्यात आली. भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवांच्या मदतीने जैविक खते व कीटकनाशक निर्मिती बद्दल माहिती देण्यात आली, तसेच जैन हिल्स समूहातील बनाना प्लांट टिशू कल्चर, फूड प्रोसेसिंग, सोलर पॅनल ,शेती विषयक विविध उपकरणे भविष्यातील हायड्रोपोनिक्स शेती पद्धती व आधुनिक शेतीच्या माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली.