जळगावात अजिंठा चौफुलीवर घटना; गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ८ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास कालिंका माता मंदिराकडून अजिंठा चौफुलीकडे जातांना घडली. तसेच त्यांच्या वाहनाचे देखील नुकसान झाले असून याप्रकरणी ट्रक चालक मुन्नेश लखू जाटम (रा. श्यामपुरा, खेरा. पोस्ट, डोंचरा उमरी भिंड, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण पंडीत गुजर (वय ४४, रा. निमखेडी शिवार) हे जखमी झाले आहेत. शहरातील निमखेडी शिवारातील समर्थ कॉलनीत अरुण गुजर हे वास्तव्यास आहे. दि. ८ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास ते कालिंका माता मंदिराजवळून अजिंठा चौफुलीकडे (एमच १९, बीई २७२०) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच ४६, बीयू ७२९७) क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करतांना जोरात धडक दिली. या अपघातात अरुण गुजर हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे.
अरुण गुजर यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ट्रक चालक मुन्नेश लखु जाटम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेका संजीव मोरे करीत आहे.