भुसावळ ( प्रतिनिधी ) – प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक असे करण्यास मान्यता दिली आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड “CPSN” असा असेल.

त्यामुळे “औरंगाबाद” रेल्वे स्थानकास आता पुढे “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील, अशी माहिती डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी दिली आहे.









