जळगाव : शहरासाठी अँटीजन टेस्ट किट मागविण्यात आल्या असून याद्वारे कोरोना रुग्णांचे निदान लवकर व्हावे हा मुख्य उद्देश आहे . यासाठी सध्या पाच हजार कीट दाखल झाल्या आहेत. याद्वारे तपासणीदेखील सुरू झाली असून तपासणी केलेल्या 70 जणांचे अहवाल तत्काळ आले. यामध्ये 65 जण निगेटिव्ह आले असून पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी नागरिकांमध्ये क ोरोना तपासणीसाठी अँटीजन टेस्टचा वापर करण्यात येत असून या टेस्टव्दारे एक तासामध्ये रुग्ण बाधित किंवा अबाधित असल्याचे निदान होत आहे. त्यामुळे जळगावातही आता याची मदत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊ त यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात भेट दिली व जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजनांचा आढावा घेतला. त्या वेळी फडणवीस यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात रुग्णालयांमध्ये शासकीय अधिक ार्यांचे व्यवस्थापन असावे, असे सूचविले. तसेच महापालिकेकडे केवळ एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्णांना ने-आण क रण्यासाठी प्रश्न उद्भवतात, असाही मुद्दा मांडला होता. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्ण व उपचार व्यवस्थापनासाठी दोन शासकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकाजयांनी सांगितले. रुग्णवाहिकेच्या प्रश्नासंदर्भात मनपा दोन रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याचे सांगण्यात आले.