जळगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई
या प्रकरणी नरेंद्र सुरेश सोनार (वय ३९, रा. धनाजी काळेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील भीमसिंग मार्केटमधील महालक्ष्मी ऑनलाइन लॉटरी सेंटरवर ऑनलाइन सट्टा खेळवीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांना मिळाली. त्यांनी लगेच गुन्हे शोधपथकातील सहाय्यक फौजदार सुनील पाटील, उमेश भांडारकर, योगेश पाटील, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ आर्दीसह कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले.
या पथकाने ऑनलाइन सट्टापेढीवर छापा टाकून सट्टा खेळविणारा नरेंद्र सुरेश सोनार (वय ३९, रा. धनाजी काळेनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळन दोन हजार १५० रुपये रोख आणि सट्टा खेळविण्याचे साहित्य, असा सुमारे १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.