जळगाव (प्रतिनिधी) – ऑनलाइन अध्यापनाची सकारात्मकता संधीचे सोने करणाऱ्यांसाठीच उपक्रमशील नाविन्यपूर्ण उपक्रम घराघरातून साकारला तिरंगा ही संकल्पना राबविण्यात आल्याचे शिक्षिका श्रीमती स्नेहल प्रकाश ठाकूर यांनी सांगितले.
प्रत्येक समस्येतून एक संधी नक्की सापडते या युक्तीप्रमाणे जळगाव शहरातील अभिनव प्राथमिक विद्यालय सरावपाठ शाळेतील इ. ३री च्या वर्ग शिक्षिकेने झूम मीटिंगद्वारे घोटीव कागदाद्वारे विविध प्रकारच्या वस्तू बनवून घेतल्या.
ऑनलाइन अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त वर्गांतर्गत कार्यानुभव कार्यशाळेचे आयोजन करून तिरंगा ध्वज ही संकल्पना डोळ्यासमोर धरून घोटीव कागदाद्वारे विविध प्रकारच्या वस्तू बनवून घेतल्या व विद्यार्थ्यांना देशाविषयी निष्ठा, प्रेम आणि संस्कृती संवर्धनाचे उपदेश दिले.
सदर उपक्रमात सहभागी विद्यार्थी
कु. प्राची कुंभार, कु.तेजस्विनी जाधव, कु.तेजल चौधरी,कु.कीर्ती साळुंखे, चि.शिवम पवार यांनी सहभाग घेतला.यावेळी विद्यार्थ्यांचे व श्रीमती.स्नेहल ठाकूर यांच्या या उपक्रमाचे शिक्षण मंदिर संस्थेचे अध्यक्ष एस.डी. चौधरी सर , प्राचार्या सौ. सुवर्णा चौधरी व मुख्याध्यापक श्री. नेमाडे सर यांनी कौतुक केले.