नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या कार्यकारिणीतही स्थान मिळालेलं नाही. राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत भाजपने खासदार हिना गावित यांना स्थान दिलं आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 12 उपाध्यक्ष, महामंत्री 8, संघटन महामंत्री 1 , सहसंघटन महामंत्री 3 असा समावेश आहे.
भाजप कार्यकारिणीत महाराष्ट्रातून कुणाला स्थान?
पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री)
विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री)
विजया राहटकर (राष्ट्रीय मंत्री)
सुनिल देवधर (राष्ट्रीय मंत्री)
व्ही. सतीश (राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री)
जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा)
हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता)
संजू वर्मा (राष्ट्रीय प्रवक्ता)
जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपची कार्यकारिणी जाहीर होणार होती. मात्र, त्याच दरम्यान कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने ही कार्यकारिणी लांबली. आज अखेर नड्डा यांनी त्यांची टीम जाहीर केली आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून पक्षाच्या राष्ट्रीय महामंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकर आणि सुनिल देवधर यांची वर्णी लागली आहे. तर सहसंघटन मंत्री म्हणून व्ही. सतीश यांची तर अल्पसंख्यक मोर्चावर जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून केवळ 8 जणांचीच वर्णी लागली आहे.