मुंबई ( वृत्तसंस्था ) – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत ईडीची कारवाई आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
काल वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहारांत ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती. यावर नवाब मलिकांनी ईडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी म्हटलं, कालपासून ईडीच्या माध्यमातून बातम्या पेरण्याची सुरुवात झाली की, आता वक्फ बोर्डाच्या प्रकरणात ईडीने छापेमारी केलेली आहे. नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होणार, नवाब मलिक गोत्यात येणार आहेत.
मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगतो की, तुमचे जे कोणी आका असतील त्यांना खूश करण्यासाठी अशा बातम्या पेरू नका. पत्रकार परिषद घ्या किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून जे काही सत्य आहे ते जाहीर करा. पुण्यात ज्या प्रकरणात ईडीने पुण्यात कारवाई केली. पुणे एमआयडीसीने भूसंपादन करुन भूसंपादन अधिकाऱ्यांकडे पैसे दिले.
खोटे कागदपत्रे तयार करुन लोकांनी सरकारी कार्यालयातून पैसे घेतले होते. त्याची बोर्डाला माहिती होताच बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पाच जणांना अटक केली. .
ईडी आम्हाला क्लीन अपसाठी मदत करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. आम्ही सात प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. वक्फ बोर्डाने क्लीन अप मोहीम महाराष्ट्रात सुरू केलीय. भाजप म्हणतय की, नवाब मलिकांचा वक्फ बोर्डाचा घोटाळा बाहेर काढणार.
आम्ही तर म्हणतोय क्लीन अप ड्राईव्ह सुरू होऊद्या. मग मंदिर, मशिद, दर्गाच्या जमीन हडप करण्याचं काम महाराष्ट्रात केलं आहे. भाजपच्या एका माजी मंत्र्याने शेकडो एकर जमीन मंदिराची हडप केली आहे. महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी अशा प्रकारची लुट केली आहे त्या सर्वांवर कारवाई व्हाययला हवी. मंदिराची जमीन माजी मंत्र्याने कशी हडप केली आणि कशा प्रकारे शेकडो कोटी रुपये खाल्ले त्याचाही भांडाफोड लवकरच करणार आहे. मी सांगू इच्छितो की, अशा कारवायांना नवाब मलिक घाबरणार नाहीये.