जळगांव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आवाहन करण्यात आले आहे. या वर्षाकरिता अल्प मुदत शेती कर्ज एप्रिलच्या पहिल्या आठवड्या पासून शेतीकर्ज वाटप सुरु करण्यात आले असून, ज्या वि.का.सहकारी संस्था रु.५० लाखाचे वर अनिष्ठ तफावत मध्ये आहेत त्या संस्थेच्या सर्व शेतकरी कर्जदार सभासदांना बँकेने ह्या वर्षा पासून थेट कर्ज पुरवठा सुरु केलेला आहे.
तरी आपले गावाचे नजिकचे जिल्हा बँकेच्या शाखेत किंवा प्राथमिक वि.का संस्थेच्या सचिवांकडे जाऊन कर्ज मागणी अर्ज भरुन शेती कर्ज घ्यावे. तसेच ज्या सभासदांना थेट कर्ज पुरवठा हवा असेल अशा सर्व सभासदांना ही जिल्हा बँकेमार्फत थेट कर्ज पुरवठा आपल्या जिल्हा बँकेचा प्रत्येक शाखामध्ये सुरु करण्यात आला आहे.तरी जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा कर्जापासून वंचीत रहाणार नाही याची खात्री आपली जिल्हा बैंक जळगांव ही ग्वाही देत आहे. तरी त्वरीत जिल्हा बँकेच्या शाखेत संपर्क करून नविन पिककर्ज घ्यावे अशी माहिती कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली आहे.