जळगाव (प्रतिनिधी) – नूतन मराठा महाविद्यालाय नाट्यशास्त्र विभागातर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी स्वीकारले. विद्यार्थ्यांनी नांदीचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. नटराज पूजन केले. तसेच राजश्री मनोहर हिने पू. ल. देशपांडे लिखित ” ती फुलराणी ” हे एकपात्री सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आभार प्रकट करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किन्नरी जोशी व हर्षल वानखेडे यांनी केले.
या कार्यक्रमाला विभाग प्रमुख डॉ. संदांशिव, उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उर्दू विभागाचे प्रमुख. डॉ. आफाक शेख आदी उपस्थितीत होते.