नूतन मराठा महाविद्यालयात आयोजन
जळगाव ([प्रतिनिधी) : येथील नूतन मराठा महाविद्यालयातील इतिहास विभागतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी.देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संकेत प्रशांत गांगुर्डे उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगून चरित्राविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी पाटील, डॉ. इंदिरा पाटील, डॉ.आर.बी.देशमुख उपस्थित होते.
“शिवरायांचा अस्सल इतिहास-चित्र आणि शिल्पातून!” या विषयावर बोलताना संकेत गांगुर्डे यांनी, छत्रपतींचा अस्सल इतिहास पुराव्यासकट मांडला गेला पाहिजे असे सांगून शिवरायांचे अस्सल रूप अस्सल इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा असे आवाहन गांगुर्डे यांनी केले. अफजलखान, शाहिस्तेखान आग्र्याहून सुटका यापलीकडे सुद्धा महाराज आहेत. इतिहास बघताना कागदपत्रांचा अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. शिवरायांचे अनेक पैलू त्यांनी चित्र आणि शिल्पातून उलगडले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे असे सांगून शिवराय डोक्यावरच नव्हे तर डोक्यातही घ्या असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तेजल पाटील यांनी केले प्रस्ताविक डॉ. इंदिरा पाटील यांनी केले. प्रमुख वक्ते परिचय प्रो.वंदना पाटील यांनी केला. आभार प्रदर्शन डॉ.मंगला तायडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी हजर होते.