बोदवड ( प्रतिनिधी ) – अवैध वाळू वाहतुकीच्या गुन्ह्यात तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर झाली असल्याचा प्रकार उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने केलेल्या तपासणीनंतर उघडकीस आला आहे
अवजड मालवाहू वाहन ( चेसिस क्र. FNE६५६८१२ ) तहसीलदारांनी जप्त केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सुनिल गुरव यांनी या वाहनांची तपासणी केली होती . बोदवड तहसिल कार्यालयाच्या आवारात अटकावून ठेवलेल्या या वाहनावर एमएच १९/ वाय- ४४६४ हा वाहन क्रमांक आढळून आला . या वाहनाचा संगणकीय अभिलेखातील वाहन क्र. एमएच-१९ / झेड- ३६३६ असून तो बदलवून त्याऐवजी चेसिस क्र. MBIG3DYC3CRDH1432 वाहन क्र. एमएच-१९ /वाय- ४४६४ हे उभे करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.
बोगस नंबर प्लेट लावून वाहतूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाहनावर (वाहन क्र. एमएच-१९/झेड-३६३६) या कार्यालयाचा १९०५१/- वाहन कर व रु. १३१३/- पर्यावरण कर थकीत असून, योग्यता प्रमाणपत्राची वैधता सुध्दा संपलेली आहे. वाहन पुन्हश्चः जप्त केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयास
कळवावे असे तहसीलदारांना कळवण्यात आले आहे वाहन मालकाचे नाव आदित्य खटोड असे आहे .