चोपडा (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप सुरेश पाटील यांनी दि . 16 नोव्हेंबर रोजी चोपडा श्रीराम नगर येथील संताजी जगनाडे महाराज यांचे मंदिरात जाऊन संताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बळीराजा दिवसानिमित्त त्यांचे हस्ते नागराची पूजा करण्यात आली. शेतकरी हाअन्नदाता असून शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे ऊभा असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी, मजूर, जवान या सर्वाना शुभेच्छा दिल्या. यावेळी के. डी. चौधरी, टी. एम. चौधरी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष रामराम पाटील, नारायण चौधरी गुरूजी, प्रशांत चौधरी, गोपीचंद चौधरी, श्रीराम मिस्तरी, जगदीश मिस्तरी रवींद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.








