भुसावळ (प्रतिनिधी ):- येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात. भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलचे स्नेहसंमेलन २०२४ ’डियुपीईएमएस ऑडसी’ चे उद्घाटन तहसीलदार नीता लबडे यांच्या हस्ते झाले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.वैभव पाटील, प्रिन्सीपल अनघा पाटील, डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटलचे डीन डॉ.प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत यावेळी उपस्थीत होते,यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य,नाट्य,सादर करून आपल्यातील कलागुण सांस्कृतीक कार्यक्रमातुन सादर केले व सर्व उपस्थीतांचे मने जिंकली. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



स्नेहसंमेलानानिमीत्त शाळेच्या इमारतीवर विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. याप्रसंगी तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी नीता लबडे व डॉ. उल्हास पाटील डॉ. वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ उल्हास पाटील म्हणाले की, भुसावळातील सीबीएससीचे ज्युनिअर कॉलेज असलेली ही पहिली एकमेव शाळा आहे. गेल्या २३ वर्षापासून ही संस्था सुरू आहे. आणि या संस्थेमधून शिकून गेलेले विद्यार्थी हे पुढे आयआयटी, इंजिनियर व इतर मोठे अधिकारी झाले. तहसीलदार नीता लबडे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन खेळात सहभागी झाले पाहीजे, खेळल्याने आपल्या शरीरात ऑक्सीजन वाढतो, खेळ तुम्हाला जिंकणे व हरणे शिकवतो. तुमची संस्था ही नावाजलेली संस्था आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये असलेली ही शाळा पुढे अजून चांगले विद्यार्थी घडवेल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त्त केला.