जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील डॉ. निकेतन जाधव यांनी नाशिक येथे पार पडलेल्या आरोह-२०२६ या आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील २० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयातील डॉ. निकेतन जाधव यांनी ए मेरे दिल तू गाये जा या गीतावर नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्याने स्पर्धेत चांगलीच धम्माल उडवून दिली. त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रशांत गुडेट्टी यांनी डॉ. निकेतन जाधव यांचा गौरव केला. तसेच माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील यांनीही डॉ. निकेतन जाधव यांचे कौतुक केले.









