भुसावळ शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहरात राहणाऱ्या मेघालय येथील १८ वर्षीय तरुणीला काम मिळून देण्याचे आमिष देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरूवारी दि. २७ रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेघालय राज्यातील १८ वर्षीय तरूणी ही काम मिळविण्यासाठी भुसावळ शहरात एप्रिल २०२४ पासून आलेली आहे. तिची मुन्नी नामक महिलेशी ओळख निर्माण झाली. या महिलेने तरुणीची चेतन नावाच्या तरूणाशी ओळख करून दिली. दरम्यान चेतनने तरूणीला काम मिळवून देण्याची आश्वासन दिले. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर पिडीत तरूणीला काम मिळाले नाही. अखेर या त्रासाला कंटाळून तरूणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी दि. २७ रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात चेतन आणि मुन्नी (दोघांचे पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल हे करीत आहे.