जळगाव ( प्रतिनिधी ) – नोकरी याचक न होता नोकरी दाते व्हा असे मागर्दर्शन स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारतचे क्षेत्र प्रमुख मनोहरलाल अग्रवाल यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना केले.ते गोदावरी आय एम आर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
विद्यार्थी आणि युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारत तर्फे गोदावरी आय एम आर महाविद्यालयात २६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक मोहनलाल अग्रवाल, स्वदेशी जागरण मंच व स्वावलंबी भारतच क्षेत्र प्रमुख, गोदावरी आय एम आर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके , डॉ . युवराज परदेशी प्रांत संयोजक , योगिताताई मालवी , प्रांत महिला समानव्यक , विशाल भोळे जिल्हा संयोजक , अजिंक्य तोतला संपर्क प्रमुख उपस्थित होते.
डॉ. प्रशांत वारके सरांनी प्रास्ताविक करतांना या कार्यक्रमाची आवश्यकता बद्दल माहिती दिली. आपल्या कौशल्याचा वापर यावेळी मनोहरलाल अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनात सरकार सर्वांना नोकरी देऊच शकत नाही. युवकांनी स्वतःच रोजगार निंर्मितीचा विचार केला पाहिजे . तुम्ही नोकरीचे याचक होण्यापेक्षा नोकरी देणारे दाते व्हा. व्यावसायिक सरकारला कर देऊन देशाची अर्थ व्यवस्था बळकट करतात. स्व:ताचा व्यवसाय सुरु करण्यासाठी उच्च शिक्षणच घेतलेले पाहिजे असे नाही. अनेक अल्प शिक्षित यशस्वी व्यावसायिक आहे. वडिलांच्या व्यवसायत मदत करून आपण स्वतःची आणि व्यवसायाची वृद्धी करतो. उद्योग करतांना कमर्चारी हे बॅकबोन आहेत हे कायम लक्षात ठेवावे. कर्मचारी सुखी तर मालक सुखी हे धोरण उद्योग मोठा करण्यास महत्वाची भूमिका ठरते हे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. उपस्थित युवकांनी नोकरी दाते होऊन देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास योगदान देऊ असा निर्धार यावेळी केला .