जळगाव ( प्रतिनिधी )- नोकरीनिमित्त रेल्वेने दररोज ये-जा करणार्या प्रवाशांसाठी तातडीने रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी भुसावळ मंडळ सल्लागार चंद्रकांत कासार यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की जळगाव शहरातून पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, पाळधी, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार तर डाऊन लाईनवर भुसावळ, खंडवा, इटारसी, मलकापूर, शेगाव, अमरावतीपर्यंत नोकरदार ये-जा करतात सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची अनुमती मिळाली आहे. पासची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार प्रवाशांचे हित लक्षात घेऊन वरील मार्गांवर सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वेसेवा सुरू करावी
सद्या परिस्थितीत कॉलेज , शाळा , व्यवसाय , कार्यालये जवळ जवळ सर्वकाही सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करता बंद असलेली पास सेवा चालू करावी , असेही त्यांनी सांगितले.