मुंबई, – राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका आहेच तर दुसरीकडे मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर पश्चिम उपनगरात भाईंदर आणि मीरा रोड भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण आता पुढच्या 24 तासांत मुंबई आणि शहरालगतच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
सोमवारी मंगळवारी मुंबई ठाणे आणि कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. राज्यातल्या काही भागात हवामान खात्याने पावसाचा पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि बीड इथे मेघगर्जनेसह पुढच्या 24 तासांमध्ये दमदार पाऊस होईल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. राज्यातल्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.