‘जळगाव — आज सकाळी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी संपर्क करून जिल्ह्यात कोरोणाच्या संसर्गामुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या अति गंभीर परिस्थितीचा संपूर्ण आढावा नामदार अजित पवार यांच्याकडे दिला .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून सांगितले, जिल्हा प्रशासनाची जबाबदारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या तिघी लोकांवरती असते.
परंतु जळगाव जिल्ह्याची परिस्थिती व येणाऱ्या वारंवार तक्रारींमुळे जिल्ह्यामध्ये प्रशासन अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याने कोरोणाचा प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कोविंड रुग्णालयात दाखल होणे म्हणजेच वैकुंठधामामध्ये दाखल होण्यासारखे आहे,सामान्य जनतेच्या मनातील भावना
मराठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच कोवीड रुग्णालय मधील भोंगळ कारभार व या रुग्णालयांमध्ये होत असलेली रुग्णांची हेडसांग तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाढत असलेल्या रुग्णांची संख्या याबद्दलची सर्व माहिती दिली.
प्रति डॉक्टर 30000 रुपयांच्या पाकिटासाठी अधिष्ठाता डॉ खैरे रोज लावतात 235 डॉक्टरांची हजेरी….
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच कोवीड रुग्णालय येथे वारंवार तक्रार करून देखील केवळ आणि केवळ तुटपुंज्या 40 डॉक्टरांवर ती संपूर्ण कोविड रुग्णालयाची जबाबदारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे .
परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हक्काचे 235 डॉक्टर कोरोणा होण्याच्या भीतीपोटी शासनाचा लाखो रुपयांचा फुकटचा पगार घेत घरात लपून बसलेले आहेत.
या संपूर्ण डॉक्टरांच्या विरोधात जळगाव जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे गेल्या काही दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली अधिष्ठाता डॉक्टर खैरे या सर्व डॉक्टरांना पाठीशी घालत आहेत असा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये उघडकीस आला.
235 डॉक्टरांना हजर करण्याच्या वाढत असलेल्या दबावामुळे तब्येतीच्या नावाखाली डॉ.खैरे रजा घेऊन पळून गेले होते
डॉक्टर खैरे यांच्यावरती या 235 डॉक्टरांना हजर करण्याचा दबाव वाढत असल्यामुळे तब्येतीचे कारण देत डॉक्टर खैरे यांनी रजा घेतली व तेही घरात बसले होते. परंतु सोशल मीडियाच्या दबावामुळे ते परत आज रूजु झाले असले तरी अशी बेजबाबदार व्यक्ती कामावर असली काय आणि नसली काय सर्व सारखच असत.
एन एस यु आय च्या मागणीमुळे मुळे बेजबाबदार अधिष्ठाता डॉक्टर खैरे यांची बदली निश्चित, लवकरच नवीन अधिष्ठाता पदभार स्वीकारणार
परंतु प्रशासन अधिकारी डॉक्टर खैरे हे जिल्ह्यात निर्माण झालेल्या अतिगंभीर परिस्थितीला जबाबदार असल्याने अधिष्ठाता डॉक्टर खैरे यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी जळगाव जिल्हा आरोग्य मंत्र्यांकडे केलेली होती व मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर खैरे यांची बदली झालेली असून लवकरच नवीन अधिष्ठाता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपला पदभार स्वीकारतील.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण जिल्ह्यात लाँकडाउनचा उडाला फज्जा
परंतु जरी अधिष्ठाता बदलले तरी सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजूनही कोरोणाच्या या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये गंभीर नाहीत व संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाँकडाउन चा फज्जा उडालेला दिसून येतो आहे.
बेजबाबदार अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्री करणार कठोर कारवाई
या संपूर्ण प्रकाराची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती जाणून घेतल्यानंतर ते पुढे बोलले की आता संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती मला माहिती पडली व मी या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार असलेल्या बेजबाबदार व आपली सेवा न देणाऱ्या या संपूर्ण डॉक्टरांवर लवकरच कठोर कारवाई करण्याचे आदेश देतो व आपणही जिल्ह्यातील नागरिकांना व आपल्या संपर्कातील नागरिकांना लॉक डाऊन या नियमांचा कडेकोट पालन करण्याचे आव्हान करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगण्यात आले.