जळगाव;- विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालयात ऑनलाइन रंगतरंग-२०२१ हा कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी आपल्या मूक भावनांना प्रतिभेची जोड देत नृत्य, चित्र व हस्तकलेचा सुंदर कलाविष्कार सादर केला. उद्घाटनाप्रसंगी रोटरी क्लबच्या डॉ. काजल फिरके, मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, बस विभाग प्रमुख मिलिंद पुराणिक उपस्थित होते. स्वतःला ऐकू येत नसले तरी केवळ समोरील व्यक्तीच्या हालचालीनुसार शब्द, सूर, ताल, लय यांची सुंदर गुंफण साधत अप्रतिम रित्या दिव्यांग कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सरस गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला. विशेष शिक्षिका अश्विनी पिंपळे व पुंडलिक गवळींनी सूत्रसंचालन केले.








