जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीतील घरासमोर लावलेली डॉक्टरची दुचाकी अज्ञात भामट्यानी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भारत दत्तू पाटील वय-४७ रा. रायसोनी नगर जळगाव हे व्यवसायाने डॉक्टर आहे. त्यांचे मयुर कॉलनी पिंप्राळा परिसरात देखील दुसरे घर आहे. त्यांच्याकडे एमएच १९ बीडब्ल्यू १०४६ क्रमांकाची दुचाकी आहे. कामाच्या निमित्ताने दुचाकीचा वापर करतात. दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या पाळधी ता. जामनेर येथे जाण्याआगोदार त्यांनी पिंप्राळा येथील घरासमोर दुचाकी १२ नोव्हेंबर रोजी पार्कींगला लावली. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घरी आल्यावर त्यांनी पार्किंगला लावलेली दिसून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता मिळून न आल्याने याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. डॉ. भरत पाटील यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. चंद्रकांत पाटील करीत आहे.