अमळनेर (प्रतिनिधी) – मा.राज्य निवडणुक आयोगाच्या पत्रांन्वये एप्रिल २०२०ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतिंचा निवडणूक कार्यक्रम दि. १५ डिसेंबर २०२० रोजी घोषित झाली आहे.
त्यानूसार प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम कसा होइल हे अमळनेर तहसिल कार्यालयाने कळविले आहे.त्यानूसार दि.
१५ डिसेंबर २०२० नोटिस प्रसिद्ध करणे.२३/१२/२०२० ते ३०/१२/२०२० सार्वजनिक सुटी वगळून नामनिर्देश मागविणे व सादर करणे. ३१/१२/२०२० नामनिर्देश छाननी करणे.०४/०१/२०२० नामनिर्देश दुपारी ०३:००पर्यंत मागे घेणे.०४/०१/२०२० दुपारी ०३:०० नंतर निवडणूक चिन्ह देणे व प्रत्यक्ष निवडणूक लढणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. दि. १५/०१/२०२० रोजी मतदान होईल.दि.१८/०१/२०२० रोजी मतमोजणी होईल.दि.२१/०१/२०२० रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवडणूकिच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.असे प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे.