समिती स्थापन करून कारवाईची मागणी
जळगाव ( प्रतिनिधी ) विद्यापीठाचे संशोधन प्रमुख प्रा. पीपी माहुलीकर यांचे संशोधन चौर्य लपविण्यासाठी विद्यापीठाने अद्याप समिती स्थापन केली नसून ती स्थापन करून अनेक तक्रारींची दाखल घेऊन दोषी संशोधक विद्यार्थ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज विद्यापीठातील कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात आले . निवेदनात म्हटले आहे कि, गेल्या अडीच वर्षांपासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्राची आपल्या विद्यापीठाने अमंलबजावणी न करता केराची टोपली दाखवली असून हि खेदाची बाब आहे . तसेच जनसंवाद व पत्रकारिता विभागातील प्रा. सुधीर भटकर यांचे विद्यार्थिनीवर असलेल्या प्रेम प्रकरणाची चौकशी समितीमार्फत तातडीने शहानिशा करून दोषींवर विद्यापीठामार्फत गुन्हा नोंदवून विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा , परीक्षा विभागातील विना निविदा एकाच पुरवठादारास दिलेल्या विविध कामांचे देयके संबंधि चौकशी व्हावी व विद्यापीठात होत असलेल्या बेकायदेशीर कामांविषयी आलेल्या तक्रारींची दखल घ्यावी अन्यथा न्यायालयात दाद मागावी असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे , अतुल कदमबांडे , सचिव राष्ट्रवादी काँग्रेस अँड. कुणाल पवार, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, रोहन सोनवणे , शिवराज पाटील भूषण भदाणे, युवा सेना जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, आदींच्या कुलगुरूंना दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.







