जळगांव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतील बी.टेक. प्रथम वर्ष अभियांत्रिकी /तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच सदर संस्थेतील एम.टेक. प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तांत्रिकीच्या रिक्त जागांसाठी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांची परिपूर्ण माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर www.nmu.ac.in वर उपलब्ध आहे. या संदर्भात डॉ.पवन मेश्राम (मो.नं. ८८०५९७६९६०) आणि डॉ.तुषार देशपांडे, समन्वयक (मो.नं. ८९५६१४०९६६) यांचेशी संपर्क साधता येईल असे संस्थेचे संचालक प्रा.जे.बी.नाईक यांनी कळविले आहे.








