जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड लिंकेजेस व्दारा लोगो व टॅगलाईन डिझाईन करण्याकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत प्रथम क्रमांकास रु.५०००/- व प्रशस्तीपत्र, व्दितीय व तृतीय करिता प्रशस्तीपत्र असे पारितोषिक ठेवण्यात येऊन प्रवेशिका पाठविणेची मुदत ३० जून अशी देण्यात आली होती. सदर मुदत १५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नियम व अटी विद्यापीठ संकेतस्थळ www.nmu.ac.in वर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. अधिकाधिक स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा असे या केंद्राचे संचालक डॉ.विकास गिते आणि प्रा.भूषण चौधरी यांनी कळविले आहे.