जळगाव ;- बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा अर्थसंकल्प विद्यार्थी, पालक यांचा भ्रमनिरास व महाराष्ट्र शासनाची दिशाभुल करणारा असल्याचा आरोप प्रा. संजय मोरे यांनी केला आहे . प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, २९ जुन रोजी, जळगाव येथील, बहिणाबाई चौधरी, उत्तरं महाराष्ट्र विद्यापीठाचा सन २०२१- २०२२ या वर्षाचा अर्थ संकल्प ३०५.१७ कोटी , रुपयांचा अर्थ संकल्पला २८जुन रोजी, झालेल्या ऑन लाईन बैठकीत मान्यता सह ३७.६१. कोटी, रुपयांची तुट दर्शवण्यात आली आहे. हा अर्थ संकल्प विद्यार्थी, पालक, जनतेची व शासनाची दिशाभुल करणारा असा आहे असा आरोप शक्तीसेनेचे राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे जिल्हाध्यक्ष कृष्ण सावळे यांनी केला आहे.