जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात मंगळवार दि.२९ जून रोजी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाच्या इमारतीसमोर यावेळी वड, पिंपळ आणि बेल आदी झाडे लावण्यात आली. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर, आजीवन अध्ययन विस्तार सेवा विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनीष जोशी, उपअभियंता इंजि.आर.आय.पाटील, प्रा.दीपक सोनवणे, उद्यान अधिक्षक अश्वीनी पाटील, सुभाष पवार, राजू सोनवणे, अरुण सपकाळे, रघुनाथ पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.