जळगाव (प्रतिनिधी ) कोरोनामुळे पालकांची आर्थिक परीस्थिती ढासल्यामुळे विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे जळगाव महानगर सचिव अँड कुणाल पवार यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात म्हटले आहे कि, तसेच मागील वर्षापासून विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन सुरु आहेत. परीक्षा शुल्कपोटी विद्यापीठाकडे कोट्यावधी रुपये जमा होतात. ऑनलाइन परिक्षेमुळे परीक्षा खर्च हा निम्माहून झाला आहे. त्यामुळे परीक्षा घेणारे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीला कोट्यवधींचा फायदा झाला आहे. तरीही विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून पुर्ण परीक्षा फी आकारत आहे.
ज्याप्रमाणे नागपूर विद्यापीठ मधील व्यवस्थापण सदस्य असा ठराव पास करू शकतात तर आपले विद्यापीठ मधील व्यवस्थापन सदस्य फक्त सभा आणि भत्ते आणि बाहेर गावी सहल करण्याकरिता फिरतात का? असा सवाल निर्माण होत आहे. आपले व्यवस्थापन सदस्य कोणाला घाबरून गप्प बसले आहे. ह्याना असे चांगले मुद्दे सुचत नाहीत का? फक्त ठेकेदार ह्यांचे बिल काढण्यासाठी एकसदस्यीय समिती स्थापन करून कसे बिल काढतात.
नागपुर विद्यापिठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा माफी चा निर्णय घेतला. मग आपली विद्यापिठ का विद्यार्थ्यांच्या परीक्षा माफीचा निर्णय घेत नाही. तसेच ऑनलाइन परीक्षा जाल्या मुळे किती कोटीची बिले विद्यापीठ नी अदा केली त्याची चौकशीत का केली जात नाही.प्रा सुधीर भट्कर ह्यांचे मी टू प्रकरणची चौकशी का पूर्ण होत नाही. किती समिती सदस्य अध्यक्ष यानी राजीनामा दिला कोण दबाव टाकत आहे. कुलगुरू यांनी याबाबतचा खुलासा करावा. अन्यथा त्या विद्यार्थीनीला न्याय द्यावा.तसेच नाट्यशास्त्र विभाग आज तागायत का सुरू झाला नाही. किती कलाकार मंडळी दुसऱ्या विद्यापीठमध्ये शिक्षणाला जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.