जळगाव (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २९ मे, २०२१ रोजी कर्मवीर व्यंकटराव रणधीर व्याख्यानमाले अंतर्गत प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
रा.से.यो.चे माजी राज्य संपर्क अधिकारी राहिलेले डॉ. साळुंके हे समाज प्रबोधन या विषयावर बोलणार असून यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील अध्यक्ष राहतील. शनिवारी सायंकाळी ६.०० वाजता ऑनलाईन व्याख्यान होईल. यावेळी किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूरचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सुधीर पाटील, रासेयोचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांची ऑनीलाईन प्रमुख उपस्थिती असेल. याशिवाय प्राचाय पी.एच.पवार, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस. पवार, डॉ. डी.के. पाटील हे देखील हजर राहतील. अशी माहिती महाविद्यालयाच्या रासेयोचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत कसबे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योगिता पाटील, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतिक शिंदे यांनी दिली आहे.