चोपडा (प्रतिनिधी) – तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे श्रीराम नगर चोपडा येथे तेली समाजाचे असलेले मंदिर आज रोजी भाविकांसाठी खुले करण्यात आले. संताजी जगनाडे समस्त तेली समाज, चोपडा या संस्थेतर्फे 16 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जगनाडे महाराज मंदिरात पूजा अर्चा करून आरती करून संताजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. पोलीस ऊपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र रायसिंग साहेब यांचे हस्ते आरती करण्यात आली. चोपडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, तेली समाजाचे अध्यक्ष के. डी. चौधरी सर, ऊपाध्यक्ष टी. एम. चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी, भिका खंडू चौधरी, प्रशांत सुभाष चौधरी, नंदु गोविंदा चौधरी, लक्ष्मण बंडू चौधरी, नारायण पंडित चौधरी, छोटू राघो चौधरी, महेंद्रकुमार आनंदराव चौधरी, रविंद्र ढोमन चौधरी, अनिल रघुनाथ चौधरी, गोरख मधुकर चौधरी, रामचंद्र आनंदा चौधरी, प्रकाश श्रावण चौधरी, रघुनाथ त्र्यंबक चौधरी, अशोक भाईदास पाटील, श्रीराम झुलाल पाटील, लक्ष्मण भरवाड, गोपीचंद रघुनाथ चौधरी, गुलाब दयाराम चौधरी, देवकांत चौधरी, सुर्यकांत चौधरी आदी अनेक स्त्री पुरूषांनी. आबालवृद्धांनी आरतीत सहभाग घेतला. मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त करण्यात आला. आज दर्शनासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली . टी . एम. चौधरी सर यानी सूत्र संचलन केले .किरण आनंदा चौधरी यांनी आभार मानले.








