जळगाव तालुक्यातील किनोद जवळ घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरून घसरून पडून गंभीररित्या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार, १५ रोजी किनोद जवळ शेती संघाच्या पेट्रोल पंपाजवळ घडली होती.
कैलास रंगला बारेला (वय ३० मुळ रा. रावण्या माल म.प्र. ह.मु. पाळधी ता. धरणगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी रविवार दिनांक २० रोजी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मयत हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाळधी येथे कुटुंबासह वास्तव्य करीत होता. मंगळवारी कैलास बारेला हा दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईजे ४७९२) ने जळगाव येथुन किनोद गावी जात होता. पंपाजवळ धावत्या दुचाकीवरुन तोल गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहेत.