जळगाव ;– नियोजित वेळेपेक्षा उशिरापर्यंत आस्थापना चालू असलेल्या १६ जणांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही नियम न पाळता दुकाने सुरु करणाऱ्या १६ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे .
या कारवाईत सुमित पाटील केकबाईट बेकरी,रणजित जैन हनुमान नगर जळगाव , मनोज गावित गोदावरी कॉलेज जवळ नुपूर हॉटेल , गिरीश धनगर कसमवाडी नारखेडे मटण हॉटेल, राजकुमार पाटील मास्कोमता नगर कोळी पेठ , मतीन पटेल किराणा दुकान , देविदास पाटील किराणा दुकान सुप्रीम कॉलनी , अनिस खान सुलतान खान सुप्रीम कॉलनी किराणा दुकान , वजीर राठोड किराणा दुकान , देवराम भंगाळे मेहरूण किराणा दुकान , नामदेव वंजारी मेहरूण किराणा दुकान , नितीन सोनवणे किराणा शिव कॉलनी , आशिष सोंगवीरा अयोध्या नगर किराणा दुकान , फरिदाबानो मोहम्मद राईस मेहरूण किराणा दुकान , सुनील मोरे रमेशवर कॉलनी किराणा दुकान , अकील खाटीक मच्छी शॉप दुकान मेहरूण जळगाव आदींवर कारवाई करण्यात आली .
यांनी केली कारवाई
हि कारवाई पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी ,आनंद सिंग पाटील ,रामकृष्ण पाटील ,दादासाहेब वाघ, सचिन पाटील, योगेश् बारी ,माजी सैनिक रवींद्र बाविस्कर ,यांनी केली आहे.