गेंदालाल मिल परिसरात ७७ हजारांचा ऐवज लंपास
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, डी.पी. जवळ असलेल्या गेंदालाल मिल परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७७ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी किसन रयाजी वसू (वय ७५, रा. डी.पी. जवळ, गेंदालाल मिल, जळगाव) हे पेन्शनर असून ते २४ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी या कालावधीत घराबाहेर गेलेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात अनाधिकृत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून एकूण मुद्देमाल ७७,४४५ रुपयेचा ऐवज चोरून नेला:
फिर्यादी वसू यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करत आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









