जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी आ राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आ. गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. यावेळी आ. संजय सावकारे ,माजी आ. स्मिताताई वाघ , महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट पर्यंत *सरासरी पडणाऱ्या* *पावसापेक्षा* पेक्षा आता पर्यंत *केवळ* 25% च्या आसपास पाऊस पडला असून जामनेर अमळनेर , पाचोरा, भडगाव ,धरणगाव ह्या तालुक्यात 25% पेक्षा ही कमी पाऊस पडला आहे व पूर्ण जिल्ह्यात पेरणीची वेळ आलेली आहे.त्यामुळे शेतकरी अतिशय चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात जलाशय अजूनही कोरडेच असल्याने पिण्याच्या पाण्याचेही व गुरांच्या चाऱ्याचे दुर्भिक्ष निर्माण झालेले आहे
जळगाव जिल्ह्यात आत्ता पर्यंत फक्त 25% पाऊस झाला असून पीक तर मरणासन्न अवस्थेत पोहचले आहेत शेतकऱ्यांनी तिबार पेरणी केल्याने आता भविष्य पीक येण्याची अशा मावळ्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी.तसेच जर लवकरच पाऊस पडला नाही तर किमान पिण्याच्या पाण्याची सोय गुरांची सोय होण्यासाठी तरी जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी आ. गिरीश महाजन यांनी यावेळी केली.
त्यामुळे जिल्ह्यांमधे खालील उपाय योजना करण्यात याव्यातजळगाव जिल्ह्यात तात्काळ कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठे कुठे निर्माण होईल याचा सर्व्हे करत तात्काळ उपाययोजना करावीत शेतकरी अत्यंत अस्वस्थ असून ते दुष्काळ जाहीर करण्यासाठी सतत प्रशासनाला निवेदन देत आहेत.