जळगाव ;- येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि , नॉन कोव्हीड रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणे अडचणीचे ठरत असून त्यांना सुविधा उपलब्ध केल्यास दिलासा मिळणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीमधील ३० टक्के निधी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले असून प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात यावी, नवीन म्यूटेन्ट स्ट्रेन तरुणांना बाधित करीत असून तरुणांनाही लस देण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक पाटिल, अशोक लाडवंजारी, सुनील माळी आदी उपस्थित होते.








