शिवसेना शिंदे गटाकडून लढण्याची तयारी
शिरसोली (वार्ताहर) : जळगाव तालुक्यातील जळके येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अर्जुन पाटील यांनी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असून ते शिवसेना शिंदे गटाकडून शिरसोली गटासाठी इच्छुक आहेत. आता जि.प.सदस्य म्हणून वडिलोपार्जित सामाजिक कार्याचा वारसा पुढे येण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
निवृत्ती अर्जुन पाटील हे जळके या गावातील ग्रामपंचायत सदस्य आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी पंचक्रोशीत अनेक सामाजिक कार्य करत आहेत. निवृत्ती पाटील यांचे वडील अर्जुन गजमल पाटील हे त्यांच्या सामाजिक कामासाठी आणि व्यावसायिक उन्नतीसाठी म्हणून परिचित आहेत. शिरसोली-धानवड हा जिल्हा परिषदेचा गट शांतताप्रिय आणि कष्टकरी ग्रामस्थांचा म्हणून ओळखला जातो.
या गटामध्ये शिरसोली प्र.न., शिरसोली प्र.बो., धानवड, जळके, विटनेर, लोणवाडी, वसंतवाडी, सुभाषवाडी, रामदेव वाडी, देव्हारी आदी गावांचा समावेश आहे. नवीन संरचनेनुसार आता जिल्हा परिषदेच्या या गटामध्ये अनेक बदल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे, त्याद्वारे गावांचा विकास करणे तसेच रोजगार, शिक्षण व आरोग्य या तीन प्रमुख बाबींच्या माध्यमातून पंचक्रोशी समृद्ध करणे असा निर्धार निवृत्ती पाटील यांनी केला आहे.
निवृत्ती पाटील यांचे वडील अर्जुन गजमल पाटील हे लाडकी बहीण योजनेचे शासकीय तालुकाध्यक्ष आहेत. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांसोबत त्याच्या वडिलांचा जोरदार संपर्क आहे. निवृत्ती पाटी जळके ग्रामपंचायतसाठी विकास कामे खेचून आणण्याचा देखील प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी आता जिल्हा परिषदेच्या या गटातील विविध गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी संपर्क सुरू केला आहे. हा जनसंपर्क माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून यातूनच आगामी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनता जनार्दन मला निवडून देईल असा विश्वास हा निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केला आहे.