जळगाव महानगरपालिका रणधुमाळी
दुपारी समर्थकांसह महापालिकामध्ये अर्ज भरणार
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षांसह अपक्षांनी मोठ्या संख्येने फॉर्म भरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक १३ मधून निवडणूक प्रभारी तथा चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले अमित पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील या दुपारी भाजप कडून समर्थकांसह मोठ्या शक्तीप्रदर्शनाने अर्ज भरणार आहेत.


जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये यंदा विविध राजकीय पक्ष जुन्या नगरसेवकांसह काही नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देणार आहेत. या नवीन तरुण चेहऱ्यांमध्ये मात्र धक्कादायक असलेले चेहरे आपल्याला बघायला मिळणार आहेत. यातच भारतीय जनता पक्षाकडून आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले अमित पाटील यांच्या पत्नी वैशाली अमित पाटील यांना प्रभाग क्रमांक १३ मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजप कडून उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी ते समर्थकांसह महानगरपालिकेत मोठ्या संख्येने जाऊन अर्ज भरणार आहेत.
भारतीय जनता पक्षातर्फे दुपारी १ वाजता कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यातच महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला आणि उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे. कोणाकोणाला उमेदवारी जाहीर झाली याबाबत अजूनही उत्सुकता कायम आहे.









