समर्थकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
जळगाव विशेष प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ येथून जयश्री राहुल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मंगळवार दि. ३० रोजी समर्थकांसह नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात दाखल केला आहे. तर भागामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे यंदा तरुण तडफदार व नवीन उमेदवारांना तिकीट देण्यामध्ये प्राधान्य दिसून येत आहे. त्यातच आता अनेक वर्षांपासून प्रभागांमध्ये सामाजिक काम करीत असलेल्या नावांचा यादीमध्ये समावेश दिसून येणार आहे.त्यातच प्रभाग क्रमांक ९ येथे जयश्री राहुल पाटील यांना भारतीय जनता पक्षातर्फे संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.


मंगळवारी सकाळी ९ वाजता समर्थकांसह व नागरिकांचे आशीर्वाद घेऊन जयश्री राहुल पाटील या महानगरपालिकेत दाखल झाल्या. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याची आम्हाला अपेक्षा असून विकास कामांचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याची माहिती जयश्री राहुल पाटील यांनी दिली आहे.










